भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदबीज साचें संमत श्रुतीचें

vedabij sachen sammat shrutichen

वेदबीज साचें संमत श्रुतीचें । गुह्य या शास्त्रांचें हरि माझा ॥१॥ तो हरि खेळतु प्रत्यक्ष मूर्तिमंतु । कृष्ण मुक्ति देतु जीवघातें ॥२॥ अर्जुना साहाकरी द्रौपदी कैवारी । तो विदुराचे घरीं अन्न मागे ॥३॥ निवृत्तीचें धन गोकुळीं श्रीकृष्ण । यादव सहिष्णु हरि माझा ॥४॥