भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें

vechaven ten jiven | puja ghade aisha naven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥१॥ बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥ फळ बीजाऐसें । कार्यकारणासरिसें ॥२॥ तुका म्हणे मान । लवणासारिखें लवण॥३॥