भजनी मालिका
← भजनांकडे परत

वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव

vatsa pale dhenu dhanve pathilagin | priticha to angin ayurbhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव ॥१॥ शिकविलें काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥ सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । म्हणऊनि लाता मागें सारी ॥२॥ तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥३॥