भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्णु महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा

varnu mahima aisi nahin maj vacha | na bolave sacha par tujha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वर्णु महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥ ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥ नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥२॥ मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥३॥ तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥४॥