भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये

varnavi te thori eka viththalachi | kirti manavachi sangon naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥ उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥ त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥२॥ अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥३॥ तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥४॥