भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारंवार हाचि न पडावा विसर । बसावें अंतर तुमच्या गुणीं

varanvar hachi na padava visar | basaven antar tumachya gunin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वारंवार हाचि न पडावा विसर । बसावें अंतर तुमच्या गुणीं ॥१॥ इच्छेचा ये दाता तूं एक समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥ध्रु.॥ लाभाचिये वोढी उताविळे मन । त्यापरि चिंतन चरणाचें ॥२॥ तुका म्हणे जीवी जीवन ओलावा । पांडुरंगे दावा शीघ्र आतां ॥३॥