भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांयां तैसे बोल हरीशीं अंतर । केले होती चार भयभेदें

vanyan taise bol harishin antar | kele hoti char bhayabheden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वांयां तैसे बोल हरीशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥ भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा झाली ॥२॥ झाली भेटी कंसा हरीशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥३॥ येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥४॥ त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥५॥