भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा

vanyan jay aisa | atan ugavava phansa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा ॥१॥ माझें परिसावें गाऱ्हाणें । सुखदुःखाचीं वचनें ॥ध्रु.॥ हाचि आम्हां ठाव । पायीं निरोपाया भाव ॥२॥ तुका म्हणे जार । तुझा तुज देवा भार ॥३॥