भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा

vanyan jaton deva | nenen bhakti karun seva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा ॥१॥ आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥ करावें तें काय । न कळें अवलोकितों पाय ॥२॥ तुका म्हणे दान । दिलें पदरीं घेईन ॥३॥