भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांयां ऐसा जन्म गेला । हें विठ्ठला दुःख वाटे

vanyan aisa janma gela | hen viththala duhkh vate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वांयां ऐसा जन्म गेला । हें विठ्ठला दुःख वाटे ॥१॥ नाहीं सरता झालों पायीं । तुम्ही जई न पुसा ॥ध्रु.॥ कां मी जीतों संवसारीं । अद्यापवरी भूमिभार ॥२॥ तुका म्हणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥३॥