भजनी मालिका
← भजनांकडे परत

वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें

vandin mi bhuten | atan avaghin chi samasten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥१॥ तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥ गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥२॥ तुका म्हणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥३॥