भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकीं

vaishnavanchi yati vani jo apan | bhogi to patan kumbhapakin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकीं ॥१॥ ऐशी वेदश्रुती बोलती पुराणें । नाही ती दुषणें हरीभक्तां ॥ ध्रु.॥ उंच नीच वर्ण न म्हणावा कोणी । जे कां नारायणी प्रिय झाले ॥२॥ चहुं वर्णासीहि असे अधिकार । करितां नमस्कार दोष नाही ॥३॥ जैसा शालिग्राम न म्हणावा पाषाण । होय पूज्य मान सर्वत्रासी ॥४॥ गुरु परब्रम्ह देवाचा हि देव त्यासी तो मानव म्हणुं नये ॥५॥ म्हणे रामेश्वर नामीं जे रंगलें । स्वयें तेचि झाले देवरूप ॥६॥