भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं

vaishnavanchi kirti gaili puranin | sahi atharanjanin chahun vedin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥१॥ ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ध्रु.॥ आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥२॥ तुका म्हणे मुगुटमणी हे भक्ती । आणीक विश्रांति आरतिया ॥३॥