भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें

vaishnavan sangati sukh vate jiva | anik mi deva kanhin nenen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥ गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥ लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥२॥ तुका म्हणे आतां आपुल्या सायासें । आम्हां जगदीशें सांभाळावें ॥३॥