भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये

vaishnavamuniviprancha sanman | karava apan gheun naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥१॥ प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥ तुका म्हणे हे आशीर्वादें बळी । जाईल तो छळी नरकायासीं ॥३॥