भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों

vairagarapashin ratnachiya khani | he chi ghyavi dhani phavel ton

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों ॥१॥ येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खऱ्याखोट्यां ॥ध्रु.॥ उगाच सारवा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥२॥ तुका म्हणे नव्हे टांचणीचें पाणी । येथें झरवणी जैशा तैसें ॥३॥