भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश

vaikunth kailas tyamaji akash

वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश । आकश‍अवकाश धरी आम्हा ॥१॥ तें रूप सुघड प्रत्यक्ष उघड । गौळियासी कोड कृष्णरूप ॥२॥ न दिसे निवासा आपरूपें दिशा । सर्वत्र महेशा आपरूपें ॥३॥ तारक प्रसिद्ध तीर्थ पै आगाध । नामाचा उद्धोध नंदाघरीं ॥४॥ प्रकाशपूर्णता आदिमध्य सत्ता । नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥५॥ निवृत्तिसाधन कृष्णरूपें खुण । विश्वीं विश्वपूर्ण हरि माझा ॥६॥