भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा

vaidya vachaviti jiva | tari kon dhyaten deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥१॥ काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु.॥ अंगी दैवत संचरे । मग तेणे काय उरे ॥२॥ नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥३॥ जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥४॥