भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चित्त अर्पीलें तें

vaibhavache dhani sakalan sharanagat | satyabhaven chitta arpilen ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चित्त अर्पीलें तें ॥१॥ नेदी उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥ जाणोनि नेणोनि अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणचि ॥२॥ तुका म्हणे बरें धाकुटयाचें जिणें । माता स्तनपानें वाढविते ॥३॥