भजनी मालिका
← भजनांकडे परत

वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून

vadilen dilen bhumidan | ten jo mage abhilasun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥१॥ अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥ उभयकुळ समवेत । नरकी प्रवेश अद्भुत ॥२॥ तप्तलोहें भेटी । तुका म्हणे कल्पकोटी ॥३॥