भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाढलियां मान न मनावी निश्चिती । भूतांचिये प्रीती भूतपण

vadhaliyan man na manavi nishchiti | bhutanchiye priti bhutapan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाढलियां मान न मनावी निश्चिती । भूतांचिये प्रीती भूतपण ॥१॥ म्हणऊनि मना लावावी कांचणी । इंद्रियांचे झणी ओढी भरे ॥ध्रु.॥ एका एकपणें एकाचिये अंगीं । लागे रंग रंगीं मिळलिया ॥२॥ तुका म्हणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणांचा ॥३॥