भजनी मालिका
← भजनांकडे परत

वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मिश्रित

vade sakshatvensin vani | narayanin mishrit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मिश्रित ॥१॥ न लगे कांहीं चाचपावें । जातों भावें पेरीत ॥ध्रु.॥ भांडार त्या दातियाचें। मी कैचें ये ठायीं ॥२॥ सादावीत जातो तुका । येथें एकाएकीं तो ॥३॥