भजनी मालिका
← भजनांकडे परत

वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड

vachanen hi nad | na bole ten muken khod

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥१॥ दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥ अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥२॥ बीज पृथिवीच्या पोटीं । तुका म्हणे दावी दृष्टी ॥३॥