भजनी मालिका
← भजनांकडे परत

वचनें चि व्हावें आपण उदार । होईल विश्वंभर संपुष्ट चि

vachanen chi vhaven apan udar | hoil vishvambhar sampushta chi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वचनें चि व्हावें आपण उदार । होईल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥ सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥ वंचिलिया काय येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥२॥ तुका म्हणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥३॥