भजनी मालिका
← भजनांकडे परत

वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे

vachananche mande davave prakar | kay tya sachar kautukache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥ जातां घरा मागें । उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥ उदयीं च अस्त उदयो संपादिला । कल्पनेचा केला जागेपणें ॥२॥ जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करुनी तुका ॥३॥