भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव

uthoniyan tuka gela nijasthala | urale raula maji dev

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥१॥ नेउल जालें सेवका स्वामींचें । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥ध्रु.॥ पहुडलिया हरी अनंतशैनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥२॥ अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥३॥