भजनी मालिका
← भजनांकडे परत

उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात

usantilya karmavata | bahu mota aghat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात ॥१॥ शीघ्र यावें शीघ्र यावें । हातीं न्यावें धरूनि ॥ध्रु.॥ भागलों या खटपटे । घटपटें करितां ॥२॥ तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता खंडावी ॥३॥