भजनी मालिका
← भजनांकडे परत

उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये

uralen ten bhaktisukh | dolan mukh pahaven | antarinchen kan hon nenan | narayana majhiye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये ॥१॥ पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥ हातीं घेउनि चोरां भातें । दावां रितें बाळका । साजतें हें थोरपण । नाहीं दिण वत्सला ॥२॥ शाहणें तरीं लाड दावी । बाळ जेवीं मातेसी । तुका म्हणे पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥