भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपकारी असे आरोनी उरला । आपुलें तयाला पर नाहीं

upakari ase aroni urala | apulen tayala par nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपकारी असे आरोनी उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥१॥ लाभावरी घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु.॥ जीवा ऐसें देखे आणिकां जीवांसी । निखळ चि रासि गुणांची च ॥२॥ तुका म्हणे देव तयांचा पांगिला । न भंगे संचला धीर सदा ॥३॥