भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपजल्या काळें शुभ कां शकुन । आतां आवरोन राहिलेती

upajalya kalen shubh kan shakun | atan avaron rahileti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपजल्या काळें शुभ कां शकुन । आतां आवरोन राहिलेती ॥१॥ नाहीं मागितली वचनाची जोडी । निष्काम रोकडी वरीवरी ॥ध्रु.॥ सत्याविण काय उगी च लांबणी । करियाची वाणी येर भूस ॥२॥ तुका म्हणे ऐसी कोणा चाळवणी । न विचारा मनीं पांडुरंगा ॥३॥