भजनी मालिका
← भजनांकडे परत

उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी

umatati vani | vate namachiya dhvani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥ बरें सेवन उपकारा । द्यावें घ्यावे या उत्तरा ॥ध्रु.॥ सरळ आणि मृद । कथा पाहावी तें उर्ध ॥२॥ गात जात तुका । हाचि उपदेश आइका॥३॥