भजनी मालिका
← भजनांकडे परत

उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें

udvegasi bahu phankati marag | navhe aisen ang majhen hoten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥ आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु॥ मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥२॥ तुका म्हणे आहे वचनाची उरी । करितों तोंवरी विज्ञापना ॥३॥