भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदासीनाचा देह ब्रम्हरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या

udasinacha deh bramharup | nahin punya pap lagat tya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उदासीनाचा देह ब्रम्हरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥१॥ अनुताप अंगीं अग्नीचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥ दोष ऐशा नावें देहाचा आदर । विटाळे अंतर अहंभावें ॥२॥ तुका म्हणे जाय नासोनियां खंती । तंव चि हे चित्तीं बद्धता ते ॥३॥