भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया

udasina pavalya vegin | anga angin jadaliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया॥१॥ वेटाळिला भोंवता हरी । मयोरफेरीं नाचती ॥ध्रु.॥ मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥२॥ तुका म्हणे नारायणीं । निराजनी मीनलिया ॥३॥