भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदारा कृपाळा पतितपावना । ब्रिदें नारायणा साच तुझीं

udara krupala patitapavana | briden narayana sach tujhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उदारा कृपाळा पतितपावना । ब्रिदें नारायणा साच तुझीं ॥१॥ वर्णिलासी जैसा जाणतां नेणतां । तैसा तूं अनंता साच होसी ॥ध्रु.॥ दैत्यां काळ भक्तं मेघश्याममूर्ती । चतुर्भुज हातीं शंख चक्र ॥२॥ काम इच्छा तयां तैसा होसी राणीं । यशोदेच्या स्तनीं पान करी ॥३॥ होऊनि सकळ कांहींच न होसी । तुका म्हणे यासी वेद ग्वाही ॥४॥