भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार तूं हरी ऐसी कीर्ती चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे

udar tun hari aisi kirti characharin | anant he thori garjatil pavade

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उदार तूं हरी ऐसी कीर्ती चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥१॥ तुझे लागों पायीं माझा भाव पुसी जन्ममरणां ठाव। देवाचा तूं देव स्वामी सकळा ब्रम्हांडा ॥ध्रु.॥ मागणें तें तुज मागों जीवभाव तुज सांगों । लागों तरी लागों पायां तुमच्या दातारा ॥२॥ दिसों देसी केविलवाणें तरी तुज चि हें उणें । तुका म्हणे जिणें माझें तुज आधीन ॥३॥