भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें

udakin kalavi shen malamutra | to hoy pavitra kasayanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥१॥ उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणां संतांचिया ॥ध्रु.॥ दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याई पापाची च मूर्ती ॥२॥ तुका म्हणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥३॥