भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्या हरीदासांची भेटी घेतां । नरका उभयतांसी जाणे

tya haridasanchi bheti ghetan | naraka ubhayatansi jane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्या हरीदासांची भेटी घेतां । नरका उभयतांसी जाणे ॥१॥ माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥ देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥२॥ तुका म्हणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥३॥