भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ध्रु.

tushin kon ghali humbari | sahi pangalya athara chari ||dhru.

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ध्रु.॥ सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥१॥ चेंडुवासवें घातली उडी । नाथिला काळिया देऊनि बुडी ॥२॥ अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥३॥ रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥४॥ जाणो तो ठावा आहेसि आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥५॥ याशीं खेळतां नाश थोरू । तुकयास्वामी सारंगधरू ॥६॥