भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं तरी हो श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती

tumhin tari ho shriyecha pati | majhi bahu hin yati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हीं तरी हो श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥१॥ दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥ माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । मी ओहोळ तूं गंगा ॥३॥