भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही तों सदैव । अधीरपणें माझी हांव

tumhi ton sadaiv | adhirapanen majhi hanv

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही तों सदैव । अधीरपणें माझी हांव ॥१॥ जळो आशेचें तें जिणें । टोंकतसावें दीनपणें ॥ध्रु.॥ येथूनि सोडवा । आतां अनुभवें देवा ॥२॥ तुका म्हणे झालें । एक मग हें निमालें ॥३॥