भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही माझा देवा करा अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं

tumhi majha deva kara angikar | ha nahin vichar majapashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही माझा देवा करा अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥१॥ आतां दोहीं पक्षीं लागलें लांछन । देवभक्तपण लाजविलें ॥ध्रु.॥ एकांतीं एकलें न राहे निश्चळि । न बैसे चपळ मन ठायीं ॥२॥ पायीं महत्वाची पडिली शृखळा । बांधविला गळा स्नेह हातीं ॥३॥ शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न हें मुखा रुचेचीना ॥४॥ तुका म्हणे झला अवगुणांचा थारा । वाढली हे निद्रा अळस बहु ॥५॥