भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां न पडे वेच । माझा सरेल संकोच

tumhan na pade vech | majha sarel sankoch

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥१॥ फुकासाठी जोडे यश । येथें कां करा आळस ॥ध्रु.॥ कृपेचें भुकेलें । होय जीवदान केलें ॥२॥ तुका म्हणे शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें ॥३॥