भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां आम्हां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी

tumhan amhan janv jaliya saman | tethen konan kon sanamani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हां आम्हां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥ उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥ नेणपणें आम्ही आळवूं वोरसें । बोलवितों रसें शब्दरत्नें ॥२॥ तुका म्हणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले भेदाभेद ॥३॥