भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी

tumachya palana odhatase man | gelon visaron apanasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥१॥ लागेल पालट फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥ तुमचे आवडी संबंधाचा त्याग । घेतला से लाग जगनिंदेचा ॥२॥ तुका म्हणे जैसा माझा जीव ओढे । तैसें च तिकडे पाहिजेल ॥३॥