भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळसी वृंदावनी उभा तो ब्राह्मण

tulasi vrundavani ubha to brahman

रचनाकार: संत बंका · अभंग
तुळसी वृंदावनी उभा तो ब्राह्मण । पुसे घरीं कोण आहे बाई ॥१॥ कोणाचें हें घर दिसतें साजिरें । मुलें आणि लेंकुरें काय आहे ॥२॥ ऐकोनी उत्तर चोखियाची कांता । प्रेमजळ नेत्रा भरियेले ॥३॥ म्हणे घरधन्यासी विठोबाचा छंद । आठविती गोविंद रात्रंदिवस ॥४॥ संसारी सुख नाहीं अणुमात्र । सदा अहोरात्र हाय हाय ॥५॥ पोटीही संतान न देखेची कांही । वायां जन्म पाहीं झाला माझा ॥६॥ वंका म्हणे ऐस बोलोनीयां मात । घाली दंडवत ब्राम्हणासी ॥७॥