भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिये संगति । झाली आमुची निश्चिति

tujhiye sangati | jhali amuchi nishchiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझिये संगति । झाली आमुची निश्चिति ॥१॥ नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥ घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥२॥ तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥३॥