भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा तोचि घडी झडो माझी

tujhen nam mukhin na ghetan avadi | jivha tochi ghadi jhado majhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा तोचि घडी झडो माझी ॥१॥ हें मज देई हें मज देई । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥ बहिरे कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जावोत डोळे ॥३॥ मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥३॥ हातपाय तेणें पंथे न चलतां । जावोत अनंता गळोनियां ॥४॥ तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका म्हणे गोड नाम तुझें ॥५॥