भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था

tujhen nam gaun atan | tujhya rangin nachon tha tha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था॥१॥ तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥ तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥ नाम घ्या रे कोणी फुका। भावें सांगतसे तुका ॥३॥