भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी

tujhen mhanavitan kay nas jala | aiken ba viththala kirti tujhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥ परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥ समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥२॥ लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥३॥ मृत्तिका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥४॥ तुका म्हणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥५॥